भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत कंत्राटी कामगारांनी केली कॉपरची चोरी


Copper stolen by contract workers in Bhusawal Ordnance Factory भुसावळ : भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत कंत्राटी पद्धत्तीने काम करणार्‍या जळगावच्या दोघा कामगारांनी कॉपर प्लेटांची चोरी केल्याचा प्रकार मंगळवार, 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास समोर आला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

झडती घेताना आढळल्या कॉपर प्लेट
भुसावळ शहरातील ऑर्डनन्स फॅक्टरीत कंत्राटी पद्धत्तीने संशयित मोहम्मद इजाज अब्दुल सत्तार (29, रा.मेहरूण, जळगाव) व समीर शाह रहिम शाह (22, मुस्लीम कॉलनी, जळगाव) हे कंत्राटी पद्धत्तीने कामावर होते. कामावरून घरी जात असतांना सुरक्षा रक्षक गेटवर तपासणी करत असतांना मोहम्मद सत्तार आणि समीर शाह यांच्याकडे चार किलो 860 ग्रॅम वजनाच्या व एक हजार 720 रुपये किंमतीच्या कॉपर प्लेट आढळल्याने त्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी ऑर्डनन्स फॅक्टरीतर्फे तुकाराम दत्तात्रय शिंगटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार पराग सोनवणे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !