जळगावातील प्रौढाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू


Adult in Jalgaon dies due to electric shock जळगाव : शहरातील एमआयडीसीतील पंचरत्न कंपनीत काम करतांना विजेच्या धक्क्याने 52 वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भीमराव धोंडू पाटील (52, लमांजन, ता.जि.जळगाव, ह.मु.शिरसोली, जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे.

शौक लागून प्रौढाचा मृत्यू
जळगाव तालुक्यातील लमांजन रहिवाशी असलेले भिमराव पाटील हे आपल्या पत्नीसह जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे वास्तव्याला होते. ते जळगाव एमआयडीसीतील पंचरत्न कंपनीत कामाला होते. नेहमीप्रमाणे बुधवार, 18 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कंपनीत काम करत असतांना त्यांन विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.



त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.रेणूका भंगाळे यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी व चार भाऊ असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !