अमळनेरातील कुविख्यात गुन्हेगार तन्वीर शेख स्थानबद्ध
Notorious criminal Tanveer Shaikh from Amalner arrested अमळनेर : अमळनेरातील कुविख्यात गुन्हेगार तन्वीर शेख मुस्ताक (27, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर) याच्याविरोधात जिल्हाधिकार्यांनी स्थानबद्धतेचे आदेश पारीत केल्यानंतर त्यास शुक्रवारी पहाटे ठाणे कारागृहात हलवण्यात आले. या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली. अमळनेरचे निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता तर आतापर्यंत शहरातील सहा गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संशयित खुनाच्या गुन्ह्यातील आरोपर
शहरातील तन्वीर हा पेट्रोल पंपाचे मालक बाबा बोहरी यांच्या खुनाचा संशयित तन्वीरवर आरोप आहे शिवाय त्याच्याविरोधात 14 गुन्हे दाखल असून त्यात खून, घरफोडी, चोरी, दंगल, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोक्काची कारवाईनंतर संशयित सुधारत नसल्याने त्यास स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले.


