28 वर्षीय तरुणाची आत्महत्या : अयोध्या नगरातील घटना
Suicide of 28-year-old youth: incident in Ayodhya city जळगाव : 28 वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी साडे अकरा सुमारास शहरातील अयोध्या नगरात घडली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विशाल तुकाराम चौधरी (28, अयोध्या नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट
जळगाव शहरातील अयोध्या नगरात विशाल चौधरी हा आईवडील, भाऊ, पत्नी व तीन वर्षाची मुलगी यांच्यासह वास्तव्याला होता. गेल्या दोन महिन्यांपासून एमआयडीसीतील सुप्रीम पाईप कंपनीत कामाला होता. शुक्रवार, 20 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 10 वाजेच्या दरम्यान गल्लीतील नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात विशाल चौधरी याने सहभाग घेतला होता. त्यानंतर तो घरी गेला असता घरात कुणीही नसतांना किचन रूममध्ये दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, त्याची पत्नी हर्षाली या घरात आल्या असता पती विशाल चौधरी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा पाहताच तिचे हंबरडा फोडला. यानंतर गल्लीतील नागरीक व तरूणांनी धाव घेवून तातडीने खाली उतरवत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषीत केले.


आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास हवालदार सचिन मुंढे, पोलीस शिपाई आकाश राजपूत करत आहे. मयताच्या पश्चात आई सुषमा, वडील तुकाराम दयाराम चौधरी, भाऊ चिराग, पत्नी हर्षाली आणि तीन वर्षाची मुलगी एैशीका असा परिवार आहे.
