उच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक मतदार यादीत दोन नाव वाढवले


यावल : यावल तालुक्यातील बहुसंख्य गावांमधील नागरीकांचे मतदार यादीमधून नावे प्रशासनाच्या चुकीमुळे कमी करण्यात आले होते. नागरीकांची जानेवारी 2023 च्या मतदार यादीत नावे असताना त्यांची नावे एप्रिल 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमधून स्थलांतर तसेच इतर काही कारणास्तव वगळण्यात आली त्यामुळे सुरू असलेल्या ग्रामपंचायत मतदान प्रक्रियेत त्यांना सहभागी होता येत नव्हते. म्हैसवाडी, ता.यावल येथील सुहास सुकलाल कोळी तसेच काजल प्रकाश बाविस्कर यांचे नावदेखील स्थलांतराचे कारण देऊन मतदार यादीतून वगळण्यात आले. त्यांनी अ‍ॅड. जितेंद्र पाटील यांचेमार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली व 12 ऑक्टोबर 2023 रोजी न्यायालयात प्रकरण दाखल झाले. त्यावर न्यायालयाने दिनांक 13 ऑक्टोबर रोजी तात्काळ सुनावणी घेऊन प्रशासनास संबंधितांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याचे आदेश दिले. शुक्रवारी काजल प्रकाश बाविस्कर यांनी उमेदवार म्हणून म्हैसवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अर्जदार दाखल केला.

मतदार यादीमधून कोणतेही कारण नसताना अशा बर्‍याच मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहे. ज्यांची नाव वगळण्यात आलेली होती त्यांची नावे फायनल मतदार यादीमध्ये घेण्यासाठी 21 ऑगस्ट पर्यंतची मुदत असल्याने बुधवार, 18 ऑगस्ट 2023 रोजी संबंधितांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार यावल यांच्याकडे योग्य पद्धतीने हरकत घेतली होती तरीदेखील त्यांची नावे फायनल मतदार यादीत समाविष्ट नसल्याने खंडपीठात धाव घेण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !