साई पॅलेसमध्ये घरफोडी : दिड लाखांचा ऐवज लंपास
Burglary in Nimkhedi Shiwar ; One and a half lakhs was stolen जळगाव : जळगाव शहरापासून जवळ असलेल्या निमखेडी शिवारातील साई पॅलेसमधील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे, चांदीच्या मूर्त्या आणि रोकड मिळून एक लाख 54 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घराला केले टार्गेट
विजया चंद्रप्रकाश पद्मावत (45, साई पॅलेस, निमखेडी शिवार, जळगाव) या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. कामानिमित्ताने शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता विजया पद्मावत या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याने ही संधी चोरट्यांनी साधली. बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड मिळून एक लाख 54 हजारांचा किंमतीचा मुद्देमाल लांबवला.


हा प्रकार शुक्रवार, 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता विजया पद्मावत या घरी आल्यानंतर लक्षात आला. त्यांनी पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.
