ब्राह्मणे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी : सव्वा लाखांचा ऐवज लंपास
Brahmins bold house burglary here in broad daylight: 15 lakhs instead of loot एरंडोल : एरंडोल तालुक्यातील ब्राह्मणे येथे चोरट्यांनी बंद घराला टार्गेट करीत एक लाख 22 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना रविवार, 22 रोजी सकाळी साडेआठ ते 2.30 वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी कासोदा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घराला केले टार्गेट
साहेबराव डिगंबर माळी (64, ब्राह्मणे) या वयोवृद्धा ब्राह्मणे येथे वास्तव्यास असून शेती करून उदरनिर्वाह करतात. रविवारी सकाळी त्या शेतात गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील लॉक तोडून 40 हजार रुपये किंमतीच्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, अडीच हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 80 हजारांची रोकड व दहा ग्रॅम वजनाचे टोंगल असा एक लाख 22 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी भेट देत पाहणी केली.


