भुसावळ तालुका ग्रामपंचायत निवडणूक : वेल्हाळेतील सरपंच पदाचा एक अर्ज बाद


Bhusawal Taluka Gram Panchayat Election : One application for the post of Sarpanch in Velhale rejected भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेरच्या दिवसापर्यंत सरपंच पदासाठी 43 तर सदस्य पदासाठी 205 अर्ज दाखल झाले होते. सोमवार, 23 रोजी झालेल्या छाननीत विल्हाळेतील सरपंच पदाचा एक अर्ज वगळता सदस्य व सरपंचपदाचे सर्वच अर्ज वैध ठरल्याचे तहसीलच्या सूत्रांनी सांगितले. सात ग्रामपंचायतीत आता सरपंच पदासाठी 42 तर सदस्य पदासाठी 205 अर्ज असून तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सात अर्ज वैध ठरले आहेत.

सात ग्रामपंचायतीसाठी निवडणूक
भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी निवडणूक तर तीन ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होत आहे. सोमवारी सादर अर्जांपैकी विल्हाळे ग्रामपंचायतीतील एक सरपंच पदाचा अर्ज बाद ठरला तर आता सात ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी 42 तर सात ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी 205 अर्ज वैध ठरले आहेत. सरपंच पदासाठी वैध अर्जांमध्ये वराडसीम-जोगलखोरी- पाच, सुनसगाव- नऊ, चोरवड- आठ, विल्हाळे- तीन, अंजनसोंडे- चार, फुलगाव नऊ, गोजोरे चार तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी वराडसीम-जोगलखोरी- 49, सुनसगाव- 30, चोरवड व विल्हाळे- 26, अंजनसोंडे- 13, फुलगाव- 38, गोजोरे- 23 वैध अर्ज असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तीन ग्रामपंचायतींसाठी होणार्‍या निवडणुकीत शिंदी व मांडवेदिगरला प्रत्येकी दोन तर हतनूरसाठी तीन अर्ज वैध ठरले.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !