समाजातील अपप्रवृत्तीरुपी रावणाचे दहन करा : आमदार संजय सावकारे


Burn Ravana as a social evil : MLA Sanjay Savkare भुसावळ : समाजातील अपप्रवृत्ती असलेले अनेक रावण आहेत. समाजातील अपप्रवृत्तीरुपी रावण आपल्यातूनच तयार झाल्याने आता आपणच त्यांना संपवले पाहिजे. माता भगिनींवर होणारे अन्याय थांबले पाहिजे. समाजातील या रावणांचा संहार करीत दिनदुबळ्यांना मदत करावी, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी येथे केले. शहातील जय मातृभुमी मंडळातर्फे मंगळवारी टिव्ही टॉवर मैदानावर झालेल्या रावण दहन कार्यक्रमात ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
जय मातृभूमी मंडळातर्फे आयोजीत रावण दहन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे होत्या. आमदार सावकारे यांच्याहस्ते रावण तर माजी नगरसेवक मनोज बियाणींच्या हस्ते कुंभकर्ण व किरण महाजन यांच्याहस्ते मेघनाथाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठचे निरीक्षक बबन आव्हाड, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, संगी बियाणी, माजी आमदार नीळकंठ फालक, गिरीष महाजन, निर्मल कोठारी, महेंद्रसिंग ठाकूर, गिरीष महाजन, पुरुषोत्तम नारखेडे, निक्की बतरा, नितीन धांडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, राजेंद्र नाटकर, विजय चौधरी, दीपक धांडे, परीक्षीत बर्‍हाटे, शरीफ ठेकेदार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. जय मातृभुमी मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचलन पं.जगदीश शर्मा, अ‍ॅड.निर्मल दायमा यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी किशोर कोलते, ितिीन नंदवणे व मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी सहकार्य केले.

गेवराईच्या आतषबाजीचे आकर्षण
रावण दहन उत्सवात रंगबेरंगी आतषबाजी आकर्षण ठरली. विविध फॅन्सी व आकाशात फुटणार्‍या फटाक्यांचा प्रेक्षकांनी आनंद घेतला. जय मातृभुमी मंडळाने यंदा गेवराई येथून आकर्षण कारागीर बोलावले होते. रावण दहन उत्सवात शहरातील आठ ते दहा हजार नागरीकांची उपस्थिती होती.

 












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !