बेलव्हाय येथे धाडसी घरफोडी : 44 हजारांचा ऐवज लंपास
Audacious house burglary in Bellway : 44 thousand instead of Lumpas भुसावळ : भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथे घराच्या वरच्या मजल्यावरील रूमची कडी उघडून चोरट्याने गोदरेज कपाटातून 44 हजारांचा सोन्या-चांदीच्या दागिण्यांचा ऐवज लांबवला. ही घटना 9 ते 22 ऑक्टोबरदरम्यान घडली. शहरी भागात वाढलेल्या चोर्या-घरफोड्यानंतर चोरटे आता ग्रामीण भागातही पोहोचल्यानंतर ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
माहितगार चोरटा असल्याचा संशय
चेतन श्रीकांत नारखेडे (30) हे बेलव्हाय येथे परीवारासह वास्तव्याला आहेत. चोरट्यांनी राहत्या घराच्या वरच्या माळ्यावरील रूमची कडी उघडून आत प्रवेश करीत गोदरेज कपाट चाव्यांद्वारे उघडले व लॉकरमधून 15 हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, नऊ हजार रुपये किंमतीचे तीन ग्रॅमचे मंगळसूत्र, तीन हजार रुपये किंमतीचे एक गॅ्रमची अंगठी, पाच हजार रुपये किंमतीचा चांदीचा गोफ, तीन हजार रुपये किंमतीचे चांदीचे जोडवे, पंधराशे रुपये किंमतीचा चांदीचा छल्ला असा एकूण 44 हजारांचा ऐवज लांबवला. तपास हवालदार दीपक जाधव करीत आहेत.


