भुसावळात दोन ट्रक समोरा-समोर धडकल्या : चालकाचा मृत्यू
Two trucks collided head-on in Bhusawal : driver killed भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील फेकरी टाक्यानजीक भरधाव ट्रक व कंटेनर समोरा-समोर धडकून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर कंटेनरमधील दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवार, 25 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फेकरी फाट्यानजीक घडला. अपघातात दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले तर अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
दोन वाहनांमध्ये समोरा-समोर अपघात
वरणगावकडून भुसावळकडे येत असलेला भरधाव ट्रक (जी.जे.12 बी.एच.5252) व भुसावळकडून नागपूरकडे निघालेला कंटेनर (डब्ल्यू.बी. 11 ई.5686) यांच्यात समोरा-समोर धडक झाली. ही धडक इतकी जबर होती की दोन्ही वाहनांच्या समोरून भाग पूर्णपणे चेपला जावून वाहनांचे मोठे नुकसान झाले तर एका वाहनावरील चालकाचा मृत्यू झाला तर दुसर्या वाहनावरील चालकासह क्लीनरल जखमी झाला. स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना बाहेर काढण्यात मदत केली तर अपघातामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक दोन ते तीन किलोमीटरपर्यंत खोळंबली. भुसावळ तालुक्याचे हवालदार प्रेमचंद सपकाळे, श्यामकुमार मोरे, सादीक शेख, रशीद तडवी, शहर वाहतूक शाखेचे राजेंद्र वाणी आदींनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.


