पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शिर्डीत : साडेसात हजार कोटींच्या कामांचे होणार उद्घाटन
Prime Minister Narendra Modi will inaugurate works worth seven and a half thousand crores in Shirdi tomorrow मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार, 26 रोजी राज्य दौर्यावर असून त्यांच्याहस्ते साडेसात हजार कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे शिवाय पंतप्रधान हे शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेणार असल्याने शिर्डीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे दाखल होतील. श्री साई मंदिरात पूजा आणि दर्शन घेऊन, मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे ते उद्घाटन करतील शिवाय दुपारी दोन वाजेता पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन व धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करतील. दुपारी 3.15 च्या सुमारास शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित देतील. यावेळी आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल आणि वायू यांसारख्या क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी ते करतील.
नवीन दर्शनरांग संकुलाचे होणार उद्घाटन
पंतप्रधानांच्या हस्ते शिर्डीतील साईबाबा मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन होईल. दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी आरामदायी प्रतीक्षालय उभारण्यात आले असून दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसन क्षमतेची सोय करण्यात आली आहे शिवाय अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.




निळवंडे धरणाचे जलपूजन व डाव्या कालव्याचे लोकार्पण होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या काठाच्या (85 किमी) कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील. सात तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील एक) 182 गावांना याचा लाभ होणार आहे. यासाठी सुमारे पाच हजार 177 कोटी रुपये निधी खर्च करण्यात येत आहे.
यावेळी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ तसेच आयुष्मान आणि स्वामित्व कार्डचे वाटप मोदींच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर शहराला छावणीचे स्वरूप आले असून सर्वत्र काटेकोर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.