यावल तालुक्यात लोकनियुक्त सरपंचासह गिरडगाव ग्रामपंचायत व गाडर्यातील सर्व सदस्य बिनविरोध
यावल : यावल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि नऊ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत माघारीच्या दिवशी गिरडगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचासह संपूर्ण सदस्य हे बिनविरोध ठरले. गाडर्या ग्रामपंचायतीचे सर्व नऊ सदस्य बिनविरोध झाले. माघारीनंतर तालुक्यातील लोकनियुक्त सरपंचासह एकूण 23 सदस्य बिनविरोध झाले असून आता लोकनियुक्त सरपंचाच्या एकुण 10 जागांकरीता 36 उमेदवार तर सदस्यांच्या एकूण 77 जागांकरीता 194 उमेदवार रींगणात आहे. माघारीनंतर चिन्ह वाटप झाले असून ग्रामीण भागात गुरूवारपासून प्रचाराला सुरवात होत राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.
56 उमेदवारांनी घेतली माघार
बुधवारी माघारीकरीता तहसील कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी झाली होती. सदस्य पदाकरीता 56 तर सरपंच पदावरील 18 उमेदवारांनी माघार घेतली. यावल तालुक्यात 10 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रीक तर 9 ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक होत आहे. यात बुधवारी माघारीच्या दिवशी लोकनियुक्त सरपंच पदावरील 18 तर सदस्य पदाकरीता 56 उमेदवारांनी माघार घेतली. परीणामी गिरडगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचासह संपूर्ण सदस्य तर गाडर्या ग्रामपंचायतीचे सर्व 9 सदस्य तसेच म्हैसवाडी, किनगाव खुर्द, सावखेडासीम, शिरागड या गावातून एकूण 23 सदस्य बिनविरोध ठरले. एकूण 10 लोकनियुक्त सरपंच पदाकरीता 36 उमेदवार रींगणात आहेत. सदस्यांच्या एकूण 77 जागांकरीता 194 उमेदवार रिंगणात आहे. संपूर्ण प्रक्रिया तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी जी.टी.सोनवणे, सचिन जगताप, ए.वाय.बडगुजर, एम.पी.देवरे, एम.एच.तडवी, मीना तडवी, बबीता चौधरी, एस.एल.पाटील, एच.एन.तडवी, व्ही.डी.पाटील, एन.पी.वैराळकर, ए. एस. खैरनार, एस. आर. शेकोकार, के. पी. वायसे, सुयोग पाटील यांनी राबवली. माघारीनंतर निवडणूक लढवणार्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले तर ग्रामीण भागात गुरूवारपासून प्रचाराला झंझावातसुरू झाला आहे.

गिरडगावची बिनविरोध परंपरा कायम
गेल्या दोन पंचवार्षिकपासून गिरडगाव ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुकीचा पायंडा यंदादेखील कायम राहिला. येथे लोकनियुक्त सरपंच म्हणून आशा हुसेन तडवी तर सदस्य म्हणून रेहाना तडवी, किशोर पाटील, आशाबाई पाटील, शकीला तडवी, मोहिनी पाटील व प्रभाकर पाटील बिनविरोध ठरले.
गाडर्यात केवळ लोकनियुक्त सरपंच पदाकरीता निवडणूक
गाडर्या ग्रामपंचायतीचे काशीराम बारेला, शेवंती बारेला, सुलोचना बारेला, बिलवारसिंग बारेला, फुलसिंग बारेला, मीराबाई बारेला, शांताराम बारेला, लक्ष्मी बारेला, रमाबाई बारेला हे सदस्य बिनविरोध ठरले. लोकनियुक्त सरपंच पदाकरीता पाच उमेदवार रिंगणात आहे.
किनगाव खुर्दमध्ये तिरंगी लढत
किनगाव खुर्दमध्ये बाजार समितीचे उपसभापती दगडू कोळी यांच्या पत्नी रूपाली दगडू कोळीसह हसीना गफूर तडवी व समीना शब्बीर तडवी यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे.
हे ठरले बिनविरोध.
म्हैसवाडी गावातून काजल बाविस्कर, तुकाराम चौधरी, सपना चौधरी, मीना चौधरी हे चौघं तर किनगाव खुर्द स्वाती भूषण पाटील, सावखेडासीम मुस्तुफा तडवी, शिरागड रेखाबाई कोळी, बोराळे दीाली चौधरी हे बिनविरोध ठरले आहे.









