साईचरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक


शिर्डी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दुपारी एक वाजता शिर्डीत प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मोदींनी शिर्डीतील साई मंदिरात जाऊन दर्शन घेत साईबाबांच्या चरणी डोके टेकले. यावेळी मोदींच्याहस्ते 7500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले जात आहे.

साडेसात हजार कोटींच्या कामांची पायाभरणी
श्री साईबाबा समाधी मंदिरात मोदी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी साईचरणी पूजा केली. दर्शनानंतर मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही मोदींच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर, पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कालव्याचे लोकार्पण सोहळ्यासाठी रवाना झाले. शिर्डी येथील एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून मोदींच्याहस्ते आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल व वायू यांसारख्या क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !