ईच्छापूरच्या दोन केबल चोरट्यांना अटक


Two cable thieves of Ichhapur arrested मुक्ताईनगर  : मुक्ताईनगर तालुक्यातील इच्छापूर येथील दोघांना शेतातील केबल चोरी प्रकरणी व स्टार्टर चोरी प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली. संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे.

शेती साहित्याच्या चोर्‍या उघडकीस येणार
अमोल प्रल्हाद धात्रक (34, इच्छापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवार, 23 ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते मंगळवर, 24 ऑक्टोबरच्या सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान इच्छापुर शिवारातील शेत गट नंबर तीनमधील फिर्यादीच्या शेताजवळ बोरवेल जवळील 20 हजार रुपये किंमतीची आशा गोल्ड कंपनीची लाल पिवळ्या व निळ्या रंगाची 750 फूट अंदाजे इलेक्ट्रिक केबल वायर तसेच 12 हजार रुपये किंमतीचे भोपाराय कंपनीचे इलेक्ट्रिक स्टार्टर व त्यामध्ये लावलेले ऑटो स्विच, तीन कट आउट असा 32 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. मुक्ताईनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करताना गोपनीय माहितीच्या आधारे भास्कर सुपडू लोणे (60) व साहेबराव नीना लोणे (51, दोन्ही रा.इच्छापूर) यांना अटक केली. न्यायालयाने संशयिताना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास हवालदार प्रदीप इंगळे, हवालदार संतोष चौधरी, राहुल न्हावकर व अनिल देवरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !