आमदार एकनाथराव खडसेंच्या नेतृत्वावर विश्वास : काकोडासह बोरखेड्यातील 50 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


Faith in MLA Eknathrao Khadse’s leadership : 50 workers from Kakoda and Borkheda join NCP  मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धर्मनिरपेक्ष विचारसरणी पक्षाचे ध्येय धोरणे यामुळे प्रभावित होऊन माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या विकासात्मक दृष्टीकोनावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली काकोडा व बोरखेड्यातील 50 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यांनी केला पक्षात प्रवेश
भाजपा शहराध्यक्ष रामेश्वर ढोले, गजानन मनोहर भोलाणकर यांच्यासह बोरखेडा जुने येथील विकास पवार, विलास पवार, सुभाष चव्हाण, अनिल मानसिंग चव्हाण, रामदास राठोड, रमेश पवार, आकाश चव्हाण, मीराबाई मुर्‍हेकर, सविता पवार, किरण पवार, दुर्गाबाई राठोड, मेहराम राठोड, महादेव मुर्‍हेकर, मंगेश मुर्‍हेकर, कविता मुर्‍हेकर आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार एकनाथराव खडसे, अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा घालून सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.







विकासासाठी अजून निधी देणार : आमदार खडसे
यावेळी आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारा पक्ष असून विकासकामांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. गेल्या 30 वर्षात काकोडा गावातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. भविष्यात सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. बोरखेडा येथे सुद्धा विकास कामांना निधी दिला. आगामी काळात सुद्धा राहिलेल्या कामांना निधी देण्यात येईल.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !