जळगावातील कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश


Notorious criminals in Jalgaon stationed : Collector’s orders जळगाव  : शहरातील कुविख्यात गुन्हेगार मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे (31, जळगाव) यास स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढल्यानंतर जळगावातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, संशयित मयूर आलोणे हा रामानंद हद्दीतील गुन्हेगार असून त्यास कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. रामानंद नगर पोलिस ठाणे हद्दीत आतापर्यंत दहाव्या गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया रामानंद पोलिस हद्दीत करण्यात आल्या आहेत.

मयूरवर वेगवेगळे स्वरूपाचे सहा गंभीर गुन्हे दाखल
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे याच्यावर रामानंदनगर पोलीस स्टेशन, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. यात खूनाचा प्रयत्न, दरोड्या प्रयत्न, जीवेठार मारण्याची धमकी, नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे, जुगार खेळणे असे वेगवेगळे स्वरूपाचे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील कोणतीही बदल झाला नसल्याने रामानंद निरीक्षक शिल्पा पाटील यांनी एमपीडीए करण्याच्या कारवाईसाठी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठवल्यानंतर अवलोकनानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला.



कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारीत केल्यानंतर रामानंद नगर पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, एलसीबीचे हवालदार सुनील दामोदरे, पो.ना. रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक, किरण पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे याला अटक करून कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले.

वरीष्ठ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन
या प्रस्तावासाठी पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !