भुसावळातील सिंधी कॉलनीतील तरुणाला शिविगाळ


भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी दीपक चेलानी याने कॉलनीतील तरुण गोपाळ कमनानी यांना दुर्गा देवीचा मंडप काढावा यासाठी मोबाईलवरून शिविगाळ केली. याप्रकरणी कमनानी यांनी येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात निरीक्षक बबन आव्हाड यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी चेलानी याच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. सिंधी कॉलनीत सट्टा जोरात सुरू असून पोलिसांनी हा सट्टा बंद करावा तसेच चेलानी याच्याविरूध्द कारवाई करावी, अशी मागणी कमनानी यांनी पोलिसांकडे केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !