जळगावातील पिंप्राळा भागात रीक्षा चालकाकडे घरफोडी : दिड लाखांचा मुद्देमाल चोरीला
Rickshaw driver’s house burglarized in Pimprala area of Jalgaon: Goods worth half a lakh were stolen जळगाव : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम असून पिंप्राळा परीसरातील श्रीकृष्ण पार्कमधील रीक्षा चालकाच्या घरातून सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोकड मिळून एक लाख 45 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आाल. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
अनिल मधुकर वाणी (60, रा.श्रीकृष्ण पार्क, पिंप्राळा जळगाव) हे रीक्षा चालक असून परीवारासह वास्तव्याला आहेत. बुधवार, 25 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता ते बाहेरगावी नातेवाईकांकडे गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोकड मिळून एक लाख 45 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार शनिवार, 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता उघडकीस आला. वाणी यांनी यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त दिसून आल्यानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिसांना माहिती देत तक्रार दिल्यानंतर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.

