बोरखेडा हत्याकांड प्रकरण : भुसावळात सत्र न्यायालयात आज खटल्याचे होणार कामकाज

छायाचित्रकार, मुख्याध्यापक, सरपंचांची सरतपासणी


Borkheda massacre case: The proceedings of the case will be held today in the session court in Bhusawal भुसावळ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून चौघा भावंडाची हत्या करण्यात आल्याची घटना रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात 15 ऑक्टोबर 2020 रोजी घडली होती. या हत्याकांडाच्या खटल्याची भुसावळ विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या खटल्याचे सोमवार, 30 ऑक्टोबर कामकाज होणार असून यात छायाचित्रकार, शाळेचे मुख्याध्यापक, सरपंच, मुद्देमाल वाहक पोलिस कर्मचारी अशा चार जणांची साक्ष पुरावे नोंदविण्यात येणार आहेत.

अत्याचार केल्यानंतर चौघांची हत्या
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे 15 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री शेतात दोन मुले, दोन मुली अशांची हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला व त्याचवेळी अन्य भावंडांना जाग आल्याने त्यांचीदेखील हत्या करण्यात आली. या हत्याकांडाची भुसावळ सत्र न्यायालयात नियमित सुनावणी सुरू झाली आहे. सोमवारी होणार्‍या कामकाजात छायाचित्रकार, शाळेचे मुख्याध्यापक, सरपंच, मुद्देमाल वाहक पोलिस कर्मचारी अशा चार जणांची साक्ष पुरावे नोंदविण्यात येणार आहेत. या खटल्यात आतापर्यंत 19 साक्षीदार तपासले गेले आहेत. यात विशेष सरकारी वकिल अ‍ॅड. उज्वल निकम यांनी साक्षीदारांची सरतपासणी घेतील तर आरोपीतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण पाल उलट तपासणीचे कामकाज पाहतील. विशेष न्यायालयात सुरु असलेल्या या हत्याकांड खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागून आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !