भुसावळात पाणी उडाल्याच्या वादातून एकाला मारहाण : त्रिकूटाविरोधात गुन्हा
A man was beaten up due to a dispute over water splashing in Bhusawal : a crime against the trio भुसावळ : घराची गच्ची धुताना पाणी उडल्याच्या वादातून एकाला त्रिकूटाने शिविगाळ करीत बेदम मारहाण केली. ही घटना शनिवार, 28 रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी त्रिकूटाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ वादातून शिविगाळ करीत मारहाण
जन्नस फ्रान्सीस मार्शल (47, पंधरा बंगला, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, ते शनिवारी दुपारी घराची गच्ची धुत असताना पाणी संशयिताच्या अंगावर उडले व त्या रागातून संशयितांनी शिविगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी निखील मंगल कोदली, राजेश सुरेश चंडाले, विशाल सुरेश चंडाले (सर्व रा.पंधरा बंगला, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार सत्तार शेख करीत आहेत.

