चाळीसगावातील पूल पाडण्यासाठी आज रेल्वेचा पॉवर ब्लॉक
अप-डाऊन मार्गावरील आठ रेल्वे गाड्या पावणेतीन तास उशिराने धावणार
भुसावळ : चाळीसगाव शहरातील रेल्वेचा जुना पादचारी पूल पाडण्याचे ाकम मंगळवार, 31 रोजी करण्यात येत असून यानिमित्त रेल्वेने पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे अप व डाऊन मार्गावरील आठ रेल्वे गाड्या उशिराने धावणार आहेत तर वाघळी, पाचोरा, गाळण, माहेजी, म्हसावद, शिरसोली आदी स्थानकांवर या गाड्यांना सुमारे अडीच तास थांबा देण्यात आल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
या गाड्या उशिराने धावणार
भुसावळ विभागातील चाळीसगाव स्थानकावरील जुना पादचारी पूल पाडण्याचे काम मंगळवारी केले जात आहे. यासाठी अप-डाऊन मार्गावरील 11078 जम्मूतवी-पुणे झेलम एक्सप्रेस वाघळी स्थानकावर सकाळी 08.15 ते 11.00 वाजेपर्यंत (02.45 तास) थांबवली जाईल. 12142 पाटलीपुत्र-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कजगाव स्थानकावर सकाळी 08.30 ते 11.00 वाजेपर्यंत (02.30 तास), 15065 गोरखपूर-पनवेल एक्सप्रेस गाळण स्थानकावर सकाळी 8.40 ते 11.00 वाजेपर्यंत (2.20 तास), 11060 छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस पाचोरा स्थानकावर 8.45 ते 11.00 वाजेपर्यंत (2.15 तास), 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को दि गामा गोवा एक्सप्रेस माहेजी स्थानकावर सकाळी 9.50 ते 11 वाजेपर्यंत (01.10 तास), 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस म्हसावद स्थानकावर सकाळी 10.30 ते 11.00 वाजेपर्यंत (30 मिनिटे), 15946 गुवाहाटी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस शिरसोली स्थानकावर 15 मिनिटे थांबवली जाणार आहे. डाऊन मार्गावरील 20103 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्सप्रेस हिरापूर स्थानकावर 25 मिनिटे थांबवली जाणार आहे.








