भुसावळातील भोई नगरात आपला दवाखाना सुरू न झाल्यास आंदोलन


भुसावळ  : शहरात राज्य शासनाने आठ ठिकाणी आपले दवाखाने मंजूर झाले आहे मात्र केवळ एक ठिकाणी दवाखाना सुरू झाला. उर्वरीत ठिकाणी भाडेपट्टीने जागा घेवून दवाखाने सुरू करावे, असे शासनाचे आदेश असतानाही आरोग्य विभागाने ही उपाययोजना केली नाही. शहरातील श्रीनगर भोईनगर या भागात दवाखाना मंजूर असतानाही कार्यान्वित झाला नाही. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुरज चौधरी यांनी आरोग्य विभागाला निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तर आंदोलन छेडणार
महाराष्ट्र राज्य शासनाने मागील काळात आपला दवाखाना या संकल्पनेस मान्यता दिली. भुसावळ शहरासाठी एकूण आठ दवाखाने मंजूर केलेले आहेत मात्र आरोग्य विभागाने कोणतीही ठोस भूमिका अद्यापपर्यंत घेतली नाही. भुसावळ तालुका आरोग्य अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने केवळ एक, दोन दवाखाना सुरू झाला. शासनाने हे दवाखाने तत्काळ सुरू करून जनतेला याचा लाभ व्हावा यासाठी भाडे तत्वावर जागा असे आदेश काढलेले असताना अद्यापही प्रक्रिया रखडली आहे. शहरातील जळगाव रोडवरील भोई नगर, श्रीनगर हा परीसर हा अतिशय दाट वस्तीचा परीसर असून या परीसराला आपला दवाखाना मंजूर आहे मात्र तो अद्यापही सुरू झाला नाही. हा दवाखाना तत्काळ सुरू करावा अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन करू, असे निवेदन सुरज चौधरी यांनी तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !