कोल्हापूरात नेत्रतज्ज्ञ डॉ.नि.तू.पाटील यांचा सन्मान
भुसावळ : नर्मदा परीक्रमा यशस्वीपणे पूर्ण करणारे राज्यातील प्रथम आयएमए सदस्य व नेत्रतज्ज्ञ डॉ.नि.तु.पाटील यांचा कोल्हापूर याठिकाणी महाराष्ट्र नेत्र संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ.नि.तु.पाटील यांनी अतिशय खडतर समजली जाणारी नर्मदा परीक्रमा ही यशस्वीपणे पूर्ण केली असून अशी कामगिरी पार पाडणारे ते राज्यातील प्रथम वैद्यकीय व्यावसायीक आहेत.
या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा महाराष्ट्र नेत्र संघटनेतर्फे आयोजित 43 व्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये कोल्हापूर शाखेतर्फे सत्कार डॉ.जीवन टीतीयल (नवी दिल्ली) यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी कॉन्फरन्स आयोजक डॉ.संजय घोटाणे, डॉ.संजय रसाळ, डॉ.अभिजीत टागरे, डॉ.चेतन खरखांडे, डॉ.महेश दळवी, डॉ.मंदार जोगळेकर, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.श्रद्धा नाईक सोबतच महाराष्ट्र नेत्र संघटनेचेचे मुख्य सल्लागार पद्मश्री डॉ.टी.पी.लहाणे, अध्यक्ष डॉ.संतोष भिडे, सचिव डॉ.अनघा हरूर आदी उपस्थित होते.








