भुसावळ रेल्वे स्थानकावर अमृत कलशाचे पूजन
भुसावळ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा संघ अमृत कलश घेऊन सोमवारी संध्याकाळी दिल्ली येथे रवाना झाला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या संघाला समारोप देण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर आयोजित निरोप समारंभप्रसंगी भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी संघाला संबोधित केले. विद्यापीठ व्यवस्थापन परीषद सदस्य राजीव नन्नवरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनोद पाटील, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.सचिन नांद्रे, विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य प्रा.डॉ.अनिल बारी, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ.दिनेश पाटील, जळगाव विभाग समन्वयक राजीव गवारे, जळगाव जिल्हा माजी समन्वयक आणि विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य प्रा.डॉ.दयाघन राणे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.जे.बी.चव्हाण, प्रा.माधुरी पाटील, प्रा.जी.पी.वाघुळदे, प्रा.अनिल सावळे, प्रा.डॉ.एस.डी.चौधरी व भुसावळ परीसरातील महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.










