भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांना सरदार पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान


Social activist Shishir Javale from Bhusawal awarded Sardar Patel Rashtra Ratna Award भुसावळ : गेल्या अनेक वर्षापासून साईनिर्मल फाउंडेशन, श्री नरेंद्र मोदी विचार मंचच्या व इतर अनेक विविध सामाजिक राजकीय संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले भुसावळ शहरातील समाजसेवक शिशिर दिनकर जावळे यांना राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक क्रांतीकारी सेवा व समर्पित भावनेने विविध क्षेत्रात सेवावृत्ती कार्य केल्याबद्दल पद्मश्री डॉक्टर मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, एन.वाय.के.क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नीती आयोग दिल्ली, आय.एस.ओ. नामांकित संस्थेच्या वतीने व डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र उरळी कांचन यांच्या सहकार्याने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न अवॉर्ड 2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या मान्यवरांची उपस्थिती
राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी हा पुरस्कार मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 रोजी पुण्यात शिशिर जावळे यांना हा प्रतिष्ठित मानाचा पुरस्कार पद्मश्री डॉ.मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.रवींद्र भोळे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र लंकेश्री (मुंबई) यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. लेवा सखी मंडळ, पुणे अध्यक्ष किरण पाचपांडे, अल्फाज टाईम पुण्याचे मुख्य संपादक राजेखान पटेल, डॉ.गवते, विद्या प्रसारक शिक्षण मंडळ पुण्याचे सचिव सतीश गवळी, डॉ.प्रफुल पाचपांडे, अंकुश दळवी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !