दोन दुचाकींच्या भीषण अपघातात वरणगावातील दोघे ठार


Two people from Warangaon were killed in a horrific accident involving two bikes भुसावळ : दुचाकींमध्ये समोरा-समोर जोरदार धडक होवून झालेल्या अपघातात वरणगावसह फुलगावातील दोघांचा मृत्यू झाला. फुलगाव फाट्याजवळ दोन दुचाकींची बुधवारी रात्री उशीरा धडक झाली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विजय रामकृष्ण महाजन (47, रा.फुलगाव) व ललित दांडे (35, रा.वरणगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

रात्रीच्या सुमारास अपघात
बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फुलगाव फाट्याजवळ दोन दुचाकी समोरा-समोर धडकल्या. या अपघातात विजय रामकृष्ण महाजन (47, रा.फुलगाव) व ललित दांडे (35, रा.वरणगाव) हे जखमी झाल्यानंतर त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी मृतदेहावर शवविच्छेदन होईल. वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अपघाताचा गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !