रमजीपूरच्या विवाहितेचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू


Married woman of Ramjipur dies after drowning in a well रावेर : विहिरीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना रमजीपूर, ता.रावेर येथे बुधवार, 1 रोजी घडली.चिमाबाई देवा कोरडकर (25, रमजीपूर, ह.मु.भाटखेडा शिवार) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पाय घसरून पडल्याने मृत्यू
भाटखेडा शिवारातील ग्रामपंचायतीच्या मालकिच्या शेतातील वाड्यावरून रोडाच्या पलीकडे असलेल्या हेमा राणे यांच्या शेतातील विहिरीवर धुणे धुण्यासाठी चिमाबाई या बुधवारी गेल्या असता त्यांचा पाय घसरल्याने त्या विहिरीत बुडून मयत झाल्या. तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !