भुसावळातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये सेवानिवृत्तीनिमित्ताने वृक्षारोपण
भुसावळ : भुसावळ नगरपरीषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलमधील उपशिक्षक कैलासनाथ पोपट बेंडाळे हे 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने म्युनिसिपल हायस्कूलमध्ये त्यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ललित फिरके होते . सेवानिवृत्तीनिमित्त यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
रेखा सोनवणे, मनोज किरंगे, डॉ.प्रदीप साखरे, संजीव चौधरी यांनी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ललित कुमार फिरके यांनी अध्यक्षीय भाषणात बेंडाळे यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. डॉ.प्रदीप साखरे, नाना पाटील यांनी के.पी.बेंडाळे यांचा वृक्ष देऊन सत्कार केला व शाळेचे मुख्याध्यापक ललित फिरके यांनी सेवापूर्तीचे स्मृतीवृक्ष लावण्या साठी प्रोत्साहित केले. निसर्गप्रेमी महाराष्ट्र राज्य पर्यावरण प्रदूषण मंडळाचे सदस्य व क्रीडा शिक्षक व राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, कैलास बेंडाळे तसेच त्यांच्या पत्नी सुरेखा बेंडाळे, मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, एस.टी.चौधरी, नाना पाटील, मनोज किरंगे, डी.के.भंगाळे, नरेंद्र राठोड, संजय पाटील, निलेश बोराडे, अरुण नेटके, राजेंद्र बागुल, लक्ष्मण पवार, मालती भिरूड, शालिनी बनसोडे, संध्या धांडे, रेखा सोनवणे, पुनम देवकर, ज्योती शिरतुरे व शाळेतील विद्यार्थी यांच्या उपस्थिती वृक्ष लावण्यात आला.







