भुसावळ रेल्वे विभागाची ऑक्टोबर महिन्यात 121 कोटींची कमाई
121 crores revenue of Bhusawal Railway Division in the month of October भुसावळ : भुसावळ रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पांडे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यपस्थापक धीरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली वाणिज्य विभागाने ऑक्टोबर 2023 महिन्यात तब्बल एकूण 120.96 कोटी रुपयांची कमाई (महसूल) केली.
या माध्यमातून मिळाले उत्पन्न
ऑक्टोबर महिन्यात रेल्वे प्रवासी वाहतुकीतून 67.93 कोटी रुपये, माल वाहतुकीतून 43.54 कोटी रुपये, पार्सल वाहतुकीतून 7.28 कोटी रुपये, तिकीट तपासणीच्या 74 हजार केसेसमधून 5.64 कोटी तर पार्किंगच्या माध्यमातून 54.33 लाख रुपये मिळवले या शिवाय वाणिज्य प्रसिद्धी, जाहिराती आणि इतर माध्यमातून 27.70 लाख, खानपान विभागाच्या माध्यमातून 91.55 लाख, भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाची फुटकर राशीतून 48.22 लाख रुपये मिळवण्यात आले.

