भुसावळ सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद सरोदे यांना सरदार पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान
भुसावळ : आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती व सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनिक कार्य करणार्या भुसावळातील आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद नारायण सरोदे व मोहिनी सरोदे यांना समर्पित भावनेने कार्य केल्याबद्दल पद्मश्री डॉ.मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट एन.वाय.के. क्रीडा मंत्रालय भारत सरकार व निती आयोग दिल्ली आय. एस. ओ. मानांकित संस्थेच्या वतीने- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार 2023 देवून सन्मानीत करण्यात आले.
डॉ.रवींद्र भोळे यांच्याहस्ते पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृह, एरडवणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र लंकेश्री (मुंबई), किरण पाचपांडे (पुणे), डॉ.गवते, डॉ.अंकुश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार वाचनालयाचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे मिळाल्याचे सरोदे यांनी सांगितले.








