भुसावळ शहर पोलिसांनी पाठलागाअंती जप्त केला एक लाखांचा गुटखा


Bhusawal city police seized gutkha worth one lakh after a chase भुसावळ : भुसावळ शहर पोलिसांनी तापी पुलावर एका नॅनो कारचा पाठलाग करीत एक लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी संशयित किशोर राजकुमार आगीचा (सिंधी कॉलनी, भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अनिल मोरे यांना नॅनो कारमधून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस पथकासह भुसावळातील तापी नदी पुलावर गुरुवारी रात्री सापळा रचला.



नॅनो कार (एम.एच.12 जे.6716) ही साडेआठ वाजेच्या सुमारास आल्यानंतर तिला थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने वाहन पळवल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करीत वाहन पकडले. वाहनाची झडती घेतल्यानंतर त्यात 82 हजार 764 रुपये किंमतीचा गुटखा व 11 हजार 550 रुपये किंमतीची तंबाखूची पाकिटे व 80 हजारांची नॅनो कार असा एकूण एक लाख 74 हजार 314 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व संशयिताला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राहुल नारायण भोळे यांच्या फिर्यादीवरून किशोर राजकुमार आगीचा (सिंधी कॉलनी, भुसावळ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !