यावल शहरात दोन ठिकाणी चोरट्यांनी बंद घरे फोडली
Thieves broke into closed houses at two places in Yaval city यावल : यावल शहरातील विरार नगर व मदीनानगर या भागात दोन ठिकाणी घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी या घरातून रोख रक्कमेसह दागिने लांबवले. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करीत एका संशयीताला अटक केली.
एका संशयिताला अटक
यावल शहरातील हरीओम नगराशेजारी मदीना नगर आहे. तेथील रहिवासी रफीक खान नामदार खान यांच्या घरात घरफोडी झाली. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम लांबवली. दुसर्या एका घटनेत शहरातील विस्तारीत भागातील विरार नगरातील पुष्पा विजय अहिरराव यांच्या दरवाज्याचे कुलुप तोडून रोख रक्कम चोरून नेली. दोन्ही ठिकाणी चोरीत एकूण सहा हजार 700 रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात रफीक खान यांच्या फिर्यादी वरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहे.








