यावल पोलिस ठाण्याचा विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी घेतला आढावा
Yaval Police Station Special Inspector General Dr. B. G. Shekhar Patil reviewed यावल : यावल पोलिस ठाण्याच्या वार्षिक आढावा शुक्रवारी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आय.जी.) डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी घेतला. यावेळी विविध गुन्ह्यात पोलिसांची कामगिरी, निर्गमीत व प्रलंबीत गुन्हे तसेच पोलिस ठाण्यातील दस्ताऐवजांची त्यांनी तपासणी केली व एकूण कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
महानिरीक्षकांकडून पोलिस ठाण्याचा आढावा
पोलिस ठाण्यामध्ये वार्षिक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नाशिक परीक्षेत्र पोलिस महानिरीक्षक (आय.जी.) डॉ.बी.जी.शेखर पाटील हे शुक्रवारी यावलला आले होते. शुक्रवारी दुपारनंतर त्यांचे आगमन झाले. पोलिस ठाण्यात त्यांचे स्वागत अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले. यावेळी डी.वाय.एस.पी. डॉ.कुणाल सोनवणे, यावलचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर तसेच रावेर, भुसावळ, सावदा, फैजपूर येथील पोलिस अधिकारी यावेळी हजर होते.




सुरुवातीला डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी पोलीस ठाण्यात पोलिसांच्या सीसीटीएनएसद्वारे घेतल्या जाणार्या नोंदी, निर्गमीत व प्रलंबित गुन्ह्यांची माहिती. निकाली काढण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भातील अहवाल जाणून घेतला. त्यानंतर मुद्देमालाची तपासणी करण्यात आली. विविध गुन्ह्यातील वाहन आणि जप्त केलेली विविध प्रकारची सामुग्री यांची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर विविध अधिकारी, कर्मचार्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा त्यांच्यासमोर सादर करण्यात आला.