मुक्ताईनगरात खळबळ : धूम स्टाईल दोन लाखांची रोकड लांबवली


Excitement in Muktai Nagar: Dhoom style extended cash of two lakhs मुक्ताईनगर : शहरातील बस स्टॅण्डसमोरील पूजा सुपर शॉपीच्या समोरील रस्त्याच्या डिव्हाईडरजवळ मोटार सायकलवरून आलेल्या दोघांनी एकाच्या हातातून धूम स्टाईल दोन लाखांची रोकड लांबवली. ही घटना शुक्रवार, 3 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.

पाळत ठेवून केली चोरी
भगवान विश्वनाथ पाटील (65, पिंप्रीपंचम, ता.मुक्ताईनगर) हे पानटपरीवरुन पूजा शॉपीकडे परत पायी रस्ता ओलांडत होते. रस्त्याच्या डिव्हाईडरजवळ पोहोचत असतांना बोदवड चौफुलीकडून येणार्‍या रस्त्याने एक दुचाकीवरून दोन अनोळखी दुचाकीवरून आले व त्यांनी भगवान पाटील यांच्या हातातील हिरव्या रंगाची कापडी पिशवी लांबवली. या पिशवीत दोन लाख रुपये रोख व बँकेचे पासबुक व चेकबुक असलेली पैशाची कापडी पिशवी लांबवण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !