साकळीत ग्रामपंचायत निवडणुकीत पोलिसाशी हुज्जत घालत आणला अडथळा : दोघांविरोधात गुन्हा


Disturbance with Police in Gram Panchayat Elections in Sakli : Crime against both साकळी, ता.यावल :  ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान गोंधळ घालत मारहाण करीत सार्वजनिक शांततेचा भंग केल्यानंतर जाब विचारणार्‍या पोलिसांसोबत हुज्जत घालणार्‍या दोघांविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष दगडू जंजाळे आणि राहुल दगडू जंजाळे (साकळी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

असे आहे नेमके प्रकरण
संतोष जंजाळे व राहुल जंजाळे हे दोघे रविवारी दुपारी साडेतीन वाजता यावल तालुक्यातील साकळी येथे कुरेशी वाड्याच्या जवळ सार्वजनिक जागी सार्वजनिक शांततेचा भंग करीत आरडाओरड करीत होते. बंदोबस्तावरील हवालदार राजेंद्र पवार हे त्यांना समजावण्यास गेले व त्यांनी या ठिकाणी मतदान सुरू असून तुम्ही शांततेत निघून जा, असे दोघांना बजावले मात्र दोघांनी पवार यांच्याशी अरेरावी करत त्यांच्या गणवेशाची कॉलर पकडून सरकारी कामात अडथळा आणला. तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !