इनरव्हील रेलसिटीने तापी पुलाच्या रेलिंगला लावले रेडियम स्टिकर्स : अपघात टळण्यास मोठी मदत
Inner Wheel Rail City puts radium stickers on the railings of Tapi bridge : a big help in avoiding accidents भुसावळ : भुसावळ शहराला जोडणार्या तापी नदीच्या पुलावर शेकडो वाहनांचे दिवसभर वर्दळ असल्याने थंडीच्या दिवसात लवकरच धुके पडते शिवाय सायंकाळी लवकरच अंधार होत असल्याने वाहनधारकांचे लक्ष विचलित न होण्यासाठी या पुलावरील रेलिंगला रेडियम स्टीकर्स लावण्यात आले. या माध्यमातून अपघात टळण्यास मोठी होणार आहे.
यांची होती उपस्थिती
रेलिंगवर रेडियम लावण्यात आल्याने आता रात्रीच्या वेळेस पुलाचा कठडा सहजासहजी लक्षात येणार आहे व रात्रीच्या वेळेस वाहनांच्या प्रकाशात रेडियम चमकून वाहनांचा अपघात किंवा दुर्घटना टळण्यास मदत होणार असल्याचे मत इनरव्हील अध्यक्षा रेवती मांडे यांनी म्हणाल्या. प्रोजेक्टसाठी सुनीता पाचपांडे, मोना भंगाळे, प्रतीक्षा पाटील, आरती पाटील, किरण पोलदिया आदी सदस्यांनी परीश्रम घेतले.







