वाचन संस्कृतीला मिळणार बळ : रावेरात टाकाऊ वस्तूंपासून उभारला सार्वजनिक लायब्ररी बुथ

रावेर नगरपालिकेचा उपक्रम : वाचन संस्कृतीला मिळणार बळ


रावेर : वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी नगरपालिकेमार्फत साने गुरुजी सार्वजनिक उद्यानामध्ये ज्ञानकुंभ या उपक्रमांतर्गत घनकचर्‍यातील टाकाऊ पेटीपासून पब्लिक लायब्ररी बूथ उभारण्यात आला. रावेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील नागरीकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती वाढावी व घरातील जुनी पुस्तके दान करण्यासाठी नागरीकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा या उद्देशाने ज्ञानकुंभ अंतर्गत बुथ लायब्ररी निर्मिती करण्यात आली. टाकाऊ वस्तूपासून बनवल्यामुळे कमी खर्चात अभिनव उपक्रम राबविणे शक्य झाले आहे. साने गुरुजी सार्वजनिक उद्यानात नागरीकांना बसण्यासाठी व वाचनासाठी बसायला बाके आहेत. शांत व प्रसन्न वातावरण आहे. नागरीक येथे बसून पुस्तके वाचू शकतात. विविध विषयांवरील पुस्तके लहान थोरांना उपलब्ध झाल्यामुळे वाचन संस्कृती वाढणार आहे.

पुस्तके दान करा मुख्याधिकारी मालगावे
हा अभिनव प्रयोग यशस्वी झाल्यास शहरामध्ये इतर ठिकाणीही अशाप्रकारचे ज्ञानकुंभ उभारण्याचा नगरपालिकेचा मानस आहे. यासाठी नागरीकांनी आपल्याकडील पुस्तके येथे दान करावीत, असे आवाहन नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे यांनी केले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !