रेल्वे सुरत आणि ब्रह्मपूर दरम्यान साप्ताहिक उत्सव विशेष ट्रेन चालवणार
भुसावळ : दिवाळी सणानिमित्त रेल्वे गाड्यांना झालेली गर्दी पाहता सुरत आणि ब्रह्मपूर दरम्यान उत्सव विशेष चालवण्यात येणार आहे.
सुरत-ब्रह्मपूर साप्ताहिक विशेष गाडी
09069 साप्ताहिक उत्सव विशेष ट्रेन सुरत येथून दर बुधवारी 8 ते 27 दरम्यान दुपारी 2.20 वाजता सुटेल व ब्रह्मपूर येथे तिसर्या दिवशी 1.15 वाजता पोहोचेल. 09070 साप्ताहिक उत्सव विशेष ट्रेन शुक्रवार, 10 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान दर शुक्रवारी 3.30 वाजता ब्रह्मपूर येथून सुटेल आणि सुरत येथे दुसर्या दिवशी दुपारी 1.45 वाजता पोहोचेल. या गाडीला नंदुरबार, धरणगाव, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, बल्लारशाह, वारंगल, विजयवाडा, एलुरू, राजःमुंद्री, सामलकोट, दुव्वडा, पेनदुरती, कोट्टावालासा, विजयनगरंम, श्रीकाकुलाम रोड आणि पालसा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 20 एलएचबी डब्बे असतील. त्यात दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, आठ स्लीपर, तीन सामान्य द्वितीय श्रेणीसह तीन गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कारसह लगेज व्हॅन असेल.








