भुसावळात आईस्क्रीम विक्रेत्याला पाणीपुरी विक्रेत्याकडून मारहाण


Ice cream seller beaten up by panipuri seller in Bhusawal भुसावळ : आईस्क्रीम विक्रेत्याकडे आलेल्या ग्राहकाकडे फालुदा पिल्यानंतर त्याचे पैसे पाणीपुरी विक्रेत्याच्या ऑनलाईन स्कॅनरवर टाकले व हे पैसे परत मागितल्याच्या वादातून आईस्क्रीम चालकाशी हुज्जत घालत पाणीपुरी विक्रेत्याने मारहाण केल्याची संतापजनक घटना शहरातील न्यायालयासमोर रविवार, 5 रात्री 9.30 वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलिसात पाणीपुरी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयिताविरोधात गुन्हा दाखल
ओमप्रकाश नाहारमल प्रजापती (30, जामनेर रोड, गायत्री मंदिराच्या पाठीमागे, जामनेर रोड, भुसावळ) हे आईस्क्रीम विक्रेता असून न्यायालयासमोर आपली गाडी लावतात. त्यांच्याशेजारीच संशयित पंकज काजरसिंग पाटील (श्रद्धा नगर, भुसावळ) हे पाणीपुरी विक्रेते आपली गाडी लावतात. एका ग्राहकाने फालुदा पिल्यानंतर त्याचे पाटील यांच्या स्कॅनरवर टाकले व ही रक्कम प्रजापती यांनी मागितल्याचा राग आल्याने पाटील याने अश्लील शिविगाळ करीत प्रजापती यांना मारहाण केली. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !