भुसावळात जिल्हास्तरीय शालेय रस्सीखेच स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
14, 17 व 19 वर्षाआतील गटात रंगल्या स्पर्धा
Spontaneous response to district level school roping competitions in Bhusawal भुसावळ : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, जळगाव जिल्हा रस्सीखेच असोसिएशन, बियाणी स्कूल भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने 14, 17 व 19 वर्षाआतील शालेय मुला-मुलींच्या स्पर्धांचे शहरातील बियाणी स्कूलमध्ये आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्याभरातील संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच उद्घाटन बियाणी एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ.संगीता बियाणी यांच्याहस्ते करण्यात आले. शाळेचे प्राचार्य रुद्रसेन, महाराष्ट्र राज्य क्रीडा शारीरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष व रस्सीखेच असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे, रस्सीखेच असोसिएशनचे सचिव डॉ.संजय निकम, भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक राजू कुलकर्णी, डॉ. संजय निकम, प्रशांत महाजन सर्व क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.
असे आहेत विजयी संघ
14 वर्षातील मुले- अंतिम सामना माध्यमिक विद्यालय कुसुंबा विरुद्ध महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ यांच्यात होवून माध्यमिक विद्यालय कुसुंबा विजयी झाले. मुलींच्या गटात अंतिम सामना म्युनिसिपल हायस्कूल विरुद्ध बियाणी हायस्कूलमध्ये होवून भुसावळातील म्युनिसिपल हायस्कूल विजयी झाले.


17 वर्षातील मुले- अंतिम सामना न.ह.रांका हायस्कूल, बोदवड विरुद्ध बियाणी स्कूल, भुसावळ यांच्यात झाला. यात न.ह.रांका हायस्कूल, बोदवड विजयी झाला. मुलींच्या अंतिम सामना न.हं.राका बोदवडविरुद्ध माध्यमिक विद्यालय, पुरी-गोलवाडे यांच्यात झाला. यात माध्यमिक विद्यालय, पुरी-गोलवाडे विजयी झाले.
19 वर्षातील मुले- अंतिम सामना माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, कुसुंबाविरुद्ध न.ह.रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बोदवड यांच्यात झाला. यात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुसुंबे विजयी झाला. मुलींच्या गटात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुसुंबाविरुद्ध न.हं.हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, बोदवड संघात झाला. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसुंबाचा संघ विजयी झाला.
विजयी संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र
विजयी संघ नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तांत्रिक समिती सदस्य म्हणून डॉ.संजय निकम, डॉ.प्रदीप साखरे, राजू कुलकर्णी, तर पंच म्हणून भूषण भोई, राम शर्मा, प्रशांत महाजन, हेमंत सोनार, पंकज पाटील, देवानंद उन्हाळे यांनी काम पाहिले आदींनी कामं पाहिले. स्पर्धाची यशस्वीते साठी नरेंद्र मस्के यांच्यासह बियाणी स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी.सर्व क्रीडा शिक्षक यांचे योगदान लाभले.





