मुक्ताईनगर तहसील कार्यालयात दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न


A couple attempted self-immolation in Muktainagar Tehsil Office मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी ग्रामपंचायततर्गत असणार्‍या मौजे डोलारखेडा येथील जागेवरील अतिक्रमण काढण्यात येऊ नये या मागणीसाठी रवींद्र कडू सोनार व पल्लवी रवींद्र सोनार (डोलारखेडा, ता.मुक्ताईनगर) या दाम्पत्याने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल
पोलिस व होमगार्डच्या जवानांनी प्रसंगावधान राखत संबंधितांना अडविल्यामुळे अनुचित प्रकार टळला. ही घटना मंगळवार, 7 रोजी पावणेबारा वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात घडली. याप्रकरणी दाम्पत्याविरोधात प्रशांत अरुण सोनार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजीव पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !