दीपनगर 660 प्रकल्पात 110 एमव्ही क्षमतेचा स्टेशन ट्रान्सफार्मर कार्यान्वित

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी करुन घेतला आढावा


110 MV capacity station transformer commissioned in Deepnagar 660 project भुसावळ : दीपनगर 660 मेगावॅट सुपर क्रिटिकल औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात मंगळवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत 110 एमव्ही अर्थात 400 किलोवॅटच्या स्टेशन ट्रान्सफार्मरचे कार्यान्वितीकरण करण्यात आले. या स्टेशन ट्रान्सफार्मरमधून 660 मेगावॅट प्रकल्पातील विविध सयंत्रांना ग्रीडमधून येणारी वीज पुरवली जाणार आहे. यावेळी आमदार संजय सावकारे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक पंकज नागदेवते, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, 660 मेगावॅटचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, 500 बाय दोनचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड उपस्थित होते.

जानेवारीत प्रत्यक्ष वीज निर्मिती
दीपनगर 660 मेगावॅट प्रकल्पाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी भेट दिली. प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेवून हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, यासाठी सूचना करण्यात आल्या. या प्रकल्पातील सयंत्रांची अंतीम चाचणी सध्या सुरू आहे. या सयंत्रांनाही विजेचा पुरवठा करावा लागतो. ही वीज ग्रीडमधून घेतली जाते. ग्रीड व सयंत्रांना जोडणी दरम्यान आवश्यक असलेल्या 110 मेगावॅट स्टेशन ट्रान्सफार्मरचे कार्यान्वितीकरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते करण्यात आले. दीपनगर प्रकल्पातील हा स्टँडबाय ट्रान्सफार्मर आहे. यापूर्वी गेतवर्षी एक ट्रान्सफार्मर कार्यान्वित करण्यात आला होता.


आता प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू होणार असल्याने दोन्ही 110 एमव्हीचे स्टेशन ट्रान्सफार्मर सज्ज करण्यात आले आहे. या ट्रान्सफार्मरच्या जोडणीसाठी कोराडी औष्णिक केंद्रातील तज्ज्ञांची टिम बोलविण्यात आली होती. नियोजनानुसार डिसेंबर अखेर किंवा जानेवारी महिन्यात 660 मेगावॅट प्रकल्पातून प्रत्यक्षात व्यवसायीक तत्वावर विजेची निर्मिती होईल, अशी माहिती यावेळी मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी दिली. यावेळी प्रकल्पातील सर्व उपमुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व तज्ज्ञांचे पथक उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !