भुसावळ शहरातील हॉकर्स बांधवांची दिवाळी गोड


Sweet Diwali of hawkers brothers in Bhusawal city भुसावळ : ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता व अनंत अडचणींवर मात करीत भल्या पहाटे जागृत वाचकापर्यंत वृत्तपत्र पोहोचण्याचे काम करणार्‍या शहरातील वृत्तपत्र हॉकर्स बांधवांची दिवाळी विघ्नहर्ता पब्लिकेशनने गोड केली आहे. गुरुवार, 9 नोव्हेंबर रोजी विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी यांनी 58 हॉकर्स बांधवांना साडी, ड्रेस व मिठाईचे वाटप केले. गेल्या सहा वर्षांपासून विघ्नहर्ता पब्लिकेशनच्या माध्यमातून हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत आहे.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी, देवेंद्र निमाणी, जय निमाणी, दिव्य मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत सराफ, दैनिक देशदूतचे वितरण प्रतिनिधी शंतनू गचके, दैनिक तरुण भारतचे भुसावळ विभाग प्रमुख गणेश वाघ, धनश्री जाधव, बबलू ठाकूर, हातीम जरीवाला आदी उपस्थित होते. शहरातील वृत्तपत्र विक्रेते तिन्ही ऋतूंमध्ये सेवा देतात. शिवाय कोरोना काळातही या हॉकर्स बांधवांनी जीवाची पर्वा न करता पहाटेच्या समयी वेळेवर वाचकांपर्यंत अंक पोहोचवून आपली कामाप्रती असलेली निष्ठा सिद्ध केली. प्रतिकुल परीस्थितीत आपल्या संसाराचा रहाटगाडा ओढणार्‍या हॉकर्स बांधवांप्रती संवेदना जोपासत भुसावळातील विघ्नहर्ता पब्लिकेशन्सचे संचालक रवींद्र निमाणी यांनी गुरुवारी 58 बांधवांना साडी, पँटशर्ट कापड, नमकीन व मिठाईचा बॉक्स देवून शुभेच्छा दिल्या.


यांची होती उपस्थिती
हॉकर्स बांधवांपैकी सचिन सोनसळे, संजय शिवपूजे, ललित नेमाडे, राजू चंदन, आनंदा जगताप, हेमंत नेमाडे, विकास बारी, दीपक पाटील, नारायण भंगाळे आदींसह हॉकर्स बांधव उपस्थित होते.

आपणही लागतो समाजांचे देणं : रवी निमाणी
आपणही समाजाचं देणं लागतो ही भावना आहे शिवाय तीनही ऋतुंमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता वाचकांना वेळेत वृत्तपत्र पोहोचणार्‍या हॉकर्स बांधवांच्या कार्याप्रती संवेदना जोपासत गेल्या सहा वर्षांपासून उपक्रम राबवत आहे, असे विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी म्हणाले. डिजिटल युगात वृत्तपत्राचे महत्व आजही अबाधीत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य अंग असलेल्या वृत्तपत्राला पहाटेच वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्र हॉकर्स बांधवांचे योगदान मोठे आहे. समाजातील या उपेक्षीत घटकांची दिवाळी गोड व्हावी हाच या उपक्रमाचा उद्देश आहे, असेही निमाणी यांनी सांगितले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !