बिकानेर-साईनगर शिर्डी, दानापूर, पुणे दरम्यान उत्सव विशेष रेल्वे गाडी धावणार
Utsav Special Train will run between Bikaner-Sainagar Shirdi, Danapur, Pune भुसावळ : छटपूजेसह दिवाळी सणानिमित्त रेल्वे गाड्यांना प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता बिकानेर ते साईनगर शिर्डी दरम्यान 14 साप्ताहिक उत्सव विशेष गाड्यांच्या फेर्या चालवणार आहे. रेल्वेने गर्दीच्या काळात विशेष उत्सव गाड्या सुरू केल्याने भुसावळ विभागातून प्रवास करणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. साप्ताहिक उत्सव विशेष गाडी 18 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात सात फेर्या करणार आहे. बिकानेर दर शनिवारी दुपारी 12.10 वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसर्या दिवशी संध्याकाळी सात वाजता पोहोचेल. साप्ताहिक उत्सव विशेष गाडी 19 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या काळात सात फेर्या करणार आहे. दर रविवारी साईनगर शिर्डी येथून संध्याकाळी 7.35 वाजता सुटेल आणि बिकानेर येथे तिसर्या दिवशी पहाटे पाच वाजता पोहोचेल. ही गाडी डुंगेरगढ, राजलदेसर, रतनगड, चुरू, फतेहपूर शेखावती, लक्ष्मणगढ सीकर, रिंगास, ढेहर का बालाजी, जयपूर, दुर्गापुरा, सवाई माधोपूर, कोटा, रामगंज मंडी, शामगढ, नागदा, उज्जैन, संत हिरदाराम नगर, भोपाळ , इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ आणि मनमाड येथे थांबेल. या गाडीला 20 डब्बे असतील. त्यात एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान, गार्ड्स, ब्रेक व्हॅनसह सहा सामान्य डबे असतील. प्रवाशांनी या गाड्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.
पुणे-दानापूरसाठी विशेष गाडी
पुणे-दानापूर-पुणे ही विशेष उत्सव गाडी दर रविवारी (12 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर) या काळात पुण्यातून सकाळी 6.35 वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसर्या दिवशी सकाळी 11.40 वाजता पोहोचणार आहे. दानापूर येथून पुण्यासाठी ही गाडी दर सोमवारी (13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर) या काळात दानापूर येथून दुपारी 1.30 वाजता सुटेल. दुसर्या दिवशी पुणे येथे संध्याकाळी 6.20 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला 18 एसी थ्री इकोनॉमी क्लास डबे असतील.






दानापूर-पुणे एक्स्प्रेस
01419 पुणे-दानापूर एक्स्प्रेस दर बुधवारी (ि15 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर) या काळात पुण्यातून दुपारी 3.15 वाजता सुटेल. दुसर्या दिवशी ही गाडी संध्याकाळी सात वाजता दानापूरला पोहोचेल तसेच दानापूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी दर गुरूवारी (16 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर) रात्री 10.40 वाजता सुटून तिसर्या दिवशी पहाटे 5.50 वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीला 18 एसी थ्री इकोनॉमी क्लासचे डबे असतील.
तिसरी दानापूर पुणे-एक्स्प्रेस
01421 पुणे-दानापूर एक्स्प्रेस ही गाडी दर मंगळवारी (14 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर) या काळात पुण्यातून सकाळी 6.35 वाजता सुटेल दुसर्या दिवशी सकाळी 11.40 वाजता दानापूरला पोहोचेल तर परतीच्या प्रवासात ही गाडी दानापूरहून दर बुधवारी (15 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर) या काळात दुपारी 1.30 वाजता सुटेल. ही गाडी दुसर्या दिवशी पुण्यात संध्याकाळी 7.40 वाजता पोहोचेल. ही गाडी दौंड कार्ड लाईन, नगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा स्थानकावर थांबेल. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वेने केले आहे.


