भुसावळ ब्राह्मण संघ व नुपूर अ‍ॅकेडमीतर्फे 15 रोजी दिवाळी पहाटचे आयोजन


भुसावळ : शहरातील ब्राह्मण संघ व नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीच्या संयुक्त संयुक्त विद्यमाने दीपावली निमित्ताने बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाट या शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मण संघात सकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल. यात नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीचे विद्यार्थी नृत्याचे सादरीकरण करतील. सर्व रसिक नागरीकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !