दीपनगर प्रकल्पात अपघात : दोन कामगार गंभीर, दोघे किरकोळ जखमी


Accident in Deepnagar project: Two workers seriously injured, two slightly injured भुसावळ : कोळशाचा मोठा गोळा फोडण्याचे काम सुरू असताना हॉपर क्लिक्लंर कोसळून झालेल्या अपघातात दोघे गंभीर तर दोघे कंत्राटी कामगार किरकोळ जखमी झाले. हा अपघात शुक्रवार, 10 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता घडला. दोघा रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून दीपनगरातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा या अपघाताने ऐरणीवर आला आहे.

कोळसा फोडला जात असताना दुर्घटना
दीपनगर औष्णिक संच क्रमांक चारच्या बॉयरल जवळील उंचावर असलेल्या हॉपर परीसरात क्लिक्लंर (कोळशाचे मोठा गोळा) फोडण्याचे काम कंत्राटी कर्मचारी करीत हातेे. कंत्राटदार अरुण जी.पाटील या एजन्सीकडे कंत्राटी कामगार प्रदीप हरी साळवे (38, निंभोरा बुद्रूक), भीम चंद्रमोहन भंज (36, निंभोरा), अजय भंगाळे (40, ओझरखेडा, ता.भुसावळ) व राकेश कचेवार (37, निंभोरा) हे क्लिक्लंर फोडण्याचे काम करीत असताना कोळशाचा मोठा झुल्यावर पडल्याने प्रदीप साळवे व भीम चंद्रमोहन भंज हे तोल गेल्याने राखेच्या हॉपरमध्ये कोसळले तर अजय भंगाळे व राकेश कचेवार हे दोन्ही मजूर झुल्याला लटकले. या अपघातात हॉपरमध्ये पडल्याने दोघे गंभीर जखमी झाले. कामगारांच्या चेहरा, छाती, हात व पायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. झूल्यावर लटकून राहिलेल्या दोन्ही कामगारांना किरकोळ दुखापत झाली.



कामगारांच्या सुरक्षेची ‘एैसेतैशी’
दीपनगर प्रकल्पात नेहमीच कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होवूनही त्याबाबत उपाययोजना होत नसल्याने कर्मचारी जीव टांगणीला लावून काम करीत आहेत. आजच्या घटनेतही हेल्मेट किंवा सेफ्टी बेल्ट नसल्याने दोघे मजूर हॉपरमध्ये कोसळले. यामुळे दीपनगर औष्णिक केंद्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधीत एजन्सीची चौकशी करावी तसेच दोषींवर कारवाई करण्यासह कंत्राटी कामगारांना सुरक्षा साधने किमान आतातरी पुरवावीत, अशी अपेक्षा आहे. मुख्य अभियंता मोहन आव्हाड, उपमुख्य अभियंता रविंद्र सोमकुचर आदीसह अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. कंत्राटी कर्मचार्‍यांनी त्यांनी रुग्णालयात आस्थेवाईकपणे विचारपूस केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !