कपाशीवर बोंडअळीचे अतिक्रमण : शेतकर्यांची दिवाळी अंधारातच
Bollworm encroachment on cotton : Farmers’ Diwali in darkness बोदवड : बोदवड तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यातच पावसाने एक महिन्यांपेक्षा जास्त काळ दडी मारल्याने मक्याचे पीक पाहिजे तसे उगवले नाही व उत्पन्नातही घट झाली. कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असलेला तालुका यंदादेखील दुष्काळाच्या छायेत सापडला आहे.
शासन दरबारी पाठपुराव्याची अपेक्षा
बोदवड तालुक्यात 49 गावे व तीन सर्कल आहे. शासनाने बोदवड व करंजी दुष्काळग्रस्त जाहिर केले परंतु सर्वात जास्त गावे असलेला नाडगाव सर्कललचा दुष्काळग्रस्त यादीत सामावेश केला नाही. कपाशीवर बोंडअळीने अतिक्रमण केल्यामुळे कपाशीच्या कैरीत तिने शिरकाव केल्याने बोंड परीपक्व होण्याअगोदर सडले आहे त्यामुळे आतापर्यंत बोदवड तालुक्यातील शेतकर्यांच्या कोणत्याही पिकाचे पंचनामे झाले नाही. बोदवड तालुक्याला सर्कल नाही, तहसीलदार नाही रामभरोसे कारभार सुरू आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून राजकारण करणारे आतापर्यंत शासन दरबारी तालुक्यातील शेतकर्यांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.







