भुसावळात ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या छतावर रॉकेट पडल्याने लागली आग ; जिल्हाधिकार्यांकडून पाहणी
The fire started when a rocket fell on the roof of the godown where the EVMs were kept in Bhusawal भुसावळ : भुसावळ तहसील कार्यालयातील गोदामात निवडणुकीसाठीचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या छतावर फटाक्यांचे रॉकेट पडल्यामुळे गोदामावरील टाकलेला प्लास्टिकचा कागद पेटल्याचा प्रकार रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडला होता. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर तातडीने आग विझवण्यात आली. दुसर्या दिवशी सोमवारी सकाळी 11.30 वाजता जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी भेट देत पाहणी केली.
ईव्हीएम सुरक्षित
भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये असलेल्या गोदामात निवडणुकीसाठी लागणारे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहे. पाऊस गोदामात पडू नये म्हणून गोदामाच्या छतावर पत्रांवर प्लास्टिकचा कागद टाकण्यात आला आहे मात्र दिवाळी सणात कुणीतरी रॉकेट उडवल्यानंतर त्याची ठिणगी गोदामाच्या छतावर पडली व त्यामुळे आग लागली. पालिकेच्या अग्निशमन दलाला कळवताच काही वेळात बंबाने ही आग विझवली.

