वेल्हाळेतील सरपंचांंनी दिला सदस्यपदाचा राजीनामा : पोटनिवडणूक होणार


भुसावळ : वेल्हाळे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शारदा लक्ष्मण कोल्हे या लोकनियुक्त सरपंच पदावर विजयी झाल्या. त्या वॉर्ड क्रमांक दोनमधून देखील ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाल्याने दोन्ही जागांवर विजय मिळवल्याने त्यांनी आता नियमांनुसार वॉर्ड क्रमांक दोनमधील सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.

दोन पदांवर विजय : एका पदाचा राजीनामा
भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या वेल्हाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार शारदा लक्ष्मण कोल्हे या लोकनियुक्त सरपंच पदावर विजयी झाल्या. त्यांनी लोकनियुक्त सरपंच पदासोबतच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या वॉर्ड क्रमांक दोनमध्येही सदस्य पदासाठी उमेदवारी केली व त्यांनी विजय मिळवला. नियमांनुसार त्यांना दोन पदावर प्रतिनिधीत्व करता येणार नसल्याने त्यांनी वॉर्ड क्रमांक दोनच्या सदस्य पदाचा राजीनामा तहसील कार्यालयात दिला. या पदाचा शारदा कोल्हे यांनी राजीनामा दिल्याने या रीक्त पदावर आता प्रशासनाकडून पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. आगामी काळात या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहिर होईल. वेल्हाळे गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे. यामुळे पोटनिवडणूकीतही राष्ट्रवादीने आपला उमेदवार विजयी होण्यासाठी आतापासूनच नियोजन केल्याचे सांगण्यात आले. यावेळी अशोक शिंदे, बाजार समितीचे संचालक योगेश पाटील, आकाश कुरकुरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !